'राम मंदिरापेक्षा गरीबाच्या पोटात दोन घास जाणं महत्त्वाचं'
पुणे : देशभरात राममंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना अभिनेते नाना पाटेकर यांनीही राम मंदिराबाबत भाष्य केले आहे. 'काही जणांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. पण मला मात्र एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मंदिरात गेल्यासारखंच वाटेल,' असं मत नानांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात मांडलं आहे.पुण्यात खडकवासला धरणातील गाळ उपसा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची 'नाम' संस्थाही सहभागी झाली आहे. या कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते. ते म्हणाले, 'काही जणांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. पण एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मला मंदिरात गेल्यासारखंच वाटेल. त्यामुळे कोण कसं विचार करतं यावर सगळं अवलंबून आहे. काहींना राम मंदिर बांधावंसं वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे.'शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबतही नाना बोलले. शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होत नसतील म्हणून हे मोर्चे निघतात. शेतकऱ्यांसाठी एकटं सरकार सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात पुढे करायला हवा, असंही ते म्हणाले.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2rj5HwV
from Maharashtra Times https://ift.tt/2rj5HwV
Post a Comment