माधुरीला भाजपची पुण्यातून लोकसभा उमेदवारी?

मुंबई :बॉलिवूड गाजवल्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिला पुण्याच्या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा भाजप विचार करत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. यावर्षी जून महिन्यात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी 'संपर्क फॉर समर्थन' अभियानांतर्गत माधुरीची तिच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मोदी सरकारच्या काळात झालेल्या कामांविषयी शाह यांनी माधुरीला या भेटीत माहिती दिली होती. राज्यातल्या एका वरिष्ठ भाजप नेत्याने गुरुवारी सांगितले की माधुरीच्या नावाची पुणे लोकसभेच्या जागेसाठी निवड करण्यात आली आहे. ते म्हणाले, 'पक्ष २०१९ च्या निवडणुकीत माधुरीला उमेदवारी देण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. पुणे लोकसभेची जागा तिच्यासाठी योग्य असेल असे आम्हाला वाटते.'मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2Ujyhvv

No comments

Powered by Blogger.