अंत्यविधी करून परतणाऱ्या गाडीला अपघात; ६ महिला ठार
बेळगाव नातेवाईकाचे अंत्यविधी करून परतणाऱ्या बोलेरो गाडीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा महिला ठार झाल्या तर १० जण जखमी झाले. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बेळगावमधील गोकाक तालुक्यातील हिरेनंदी गावाजवळ आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. कर्नाटकातील यरझरवी आणि माडमगेरी गावातील कुटुंब आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी करून गावाकडे परतत असताना त्यांच्या भरधाव बोलेरो गाडीला ट्रॅक्टरने समोरून जोरदार धडक दिली. ही घटना आज सकाळी तीनच्या सुमारास हिरेनंदी गावाजवळ घडली. या भीषण अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंगावा हुराली (वय ३०), कशाव्वा खांदरी (वय ७०), यल्लाव्वा पुजारी (वय ४५), यल्लावा गुंडाप्पानावर (वय ४०), रेणुका सोपाड्ला (वय३५), मल्लाव्वा खांदरी अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. या सर्व मृत महिला सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी व यरझरवी गावातील रहिवासी आहेत. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2rlCRw6
from Maharashtra Times https://ift.tt/2rlCRw6
Post a Comment