'अवनी'ला गोळी मारणे बेकायदाच; अहवालाचा निष्कर्ष
नागपूर: अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात वाघिणीवर गोळी झाडणारा शिकारी असगर अली खान आणि वन कर्मचारी मुखबिर शेख यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अवनी वाघिणीला गोळी घालणे बेकायदेशीरच होते, असंही समितीनं अहवालात नमूद केलं आहे.राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने अवनीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. अवनीला जेरबंद करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडू यांनी 'डार्ट' तयार केला होता आणि त्यांच्या उपस्थितीतच तो 'डार्ट' मारला जावा, असे ठरले होते. मात्र, याकडे असगर अली आणि मुखबिर शेख यांनी दुर्लक्ष केले. वाघिणीला जेरबंद करण्याला प्राधान्य देण्याऐवजी तिला थेट मारण्यात आलं, असंही अहवालात म्हटलं आहे.अवनीला पकडण्यासाठी वन विभागानं चांगली पूर्वतयारी केली होती. मात्र, २ नोव्हेंबर रोजी तिला आणि तिच्या शावकांना पकडण्यासाठी योग्य नियोजन केले गेले नाही. स्व-संरक्षणार्थ अवनीला गोळी घालावी लागली असा दावा असगी अली खान याने केला होता. हा दावा देखील संशयास्पद असल्याचं समितीनं म्हटलं आहे.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times maharashtra/nagpur-vidarbha-news/it-was-illegal-to-shot-dart-at-avani/articleshow/66969208.cms
from Maharashtra Times maharashtra/nagpur-vidarbha-news/it-was-illegal-to-shot-dart-at-avani/articleshow/66969208.cms
Post a Comment