बुलंदशहर हिंसा हा अपघात: योगी आदित्यनाथ

लखनऊ: उत्तर प्रदेशात मॉब लिंचिंगची घटना घडलेली नाही. बुलंदशहरमधील घटना हा एक अपघात होता, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. बुलंदशहरमधील हिंसाचाराच्या घटनेत पोलीस निरीक्षकासह दोघांचा मृत्यू झाला होता.'बुलंदशहरमध्ये जी घटना घडली, ती एक दुर्घटना होती. पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे. या घटनेतील दोषींना सोडणार नाही,' असं आदित्यनाथ म्हणाले. गो हत्याच नव्हे, तर अनधिकृत कत्तलखान्यांवरही राज्यात बंदी आहे आणि असे प्रकार सुरू राहिल्यास त्याला संबंधित जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असंही ते म्हणाले. तत्पूर्वी, हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह दोघांचा मृ्त्यू झाला होता. सुबोध कुमार यांच्या कुटुंबीयांनी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी सुबोध कुमार यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि न्याय देण्यात येईल, असं आश्वासन आदित्यनाथ यांनी दिलं होतं. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2L2Madm

No comments

Powered by Blogger.