महापरिनिर्वाण दिनासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

महापरिनिर्वाण दिनासाठी वाहतुकीचे नियमन म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी सहा डिसेंबर रोजी लाखो अनुयायी चैत्यभूमीला भेट देतात. हे अनुयायी तसेच मुबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने दादर परिसरात वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे. ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत ८ रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. काही मार्ग एक दिशा करण्यात आले असून ८ मार्गावर पार्किंगसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमानुसार पर्यायी मार्गाचा वापर करावं असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. वाहतुकीसाठी बंद रस्ते स्वातंत्रवीर सावरकर मार्ग रानडे रोड न. चि. केळकर मार्ग केळुस्कर मार्ग (दक्षिण, उत्तर)गोखले रोड (दक्षिण, उत्तर)टिळक ब्रिज एस. के. भोळे मार्ग भवानी शंकर रोड पर्यायी मार्ग सेनापती बापट मार्ग ना. म. जोशी मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग पार्किंगला बंदी स्वातंत्रवीर सावरकर मार्ग रानडे रोड न. चि. केळकर मार्ग केळुस्कर मार्ग (दक्षिण, उत्तर)गोखले रोड (दक्षिण, उत्तर)टिळक ब्रिज एस. के. भोळे मार्ग भवानी शंकर रोड अन्नदान करणाऱ्यासाठी व्यवस्था वाहनातून अन्नदान करणाऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पास घेतलेल्यांनाशिवाजी पार्क केळुस्कर उत्तर गेट क्रमांक पाच येथून प्रवेश दिला जाईल. माहीम येथून येणारे दिलीप गुप्ते मार्गाचा वापर करू शकतात. आपत्कालीन स्थितीत वाहनांसाठी सिद्धिविनायक मंदिर ते कापड बाजार हि मार्गिका मोकळी ठेवण्यात आली आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2Ujv675

No comments

Powered by Blogger.