आता कुस्तीगीरही करारबद्ध, तिघांना 'अ' श्रेणी

वृत्तसंस्था, गोंदा (उत्तर प्रदेश)क्रिकेटप्रमाणेच आता भारतीय कुस्तीतही खेळाडूंना करारबद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने या दिशेने पाऊल टाकताना विविध श्रेणींत कुस्तीगीरांची विभागणी कली आहे. त्यात भारताचे आघाडीचे कुस्तीगीर बजरंग पुनिया, विनेश फोगट व पूजा धांडा या तिघांनाच 'अ' श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. दरवर्षी या कराराचे नूतनीकरण होणार आहे.'अ', 'ब', 'क' व 'ड' श्रेणीसाठी अनुक्रमे वार्षिक ३० लाख, २० लाख, १० लाख व ५ लाख रु. रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तर, 'ई' आणि 'फ' गटातील खेळाडूंना अनुक्रमे ३ लाख आणि १ लाख २० हजार रु. दिले जातील. ज्युनिअर (९० हजार रु.), कॅडेट (६० हजार रु.), १५ वर्षांखालील (३६ हजार रु.) असेही गट असतील. मुख्य म्हणजे ऑलिम्पिक पदकविजेते सुशीलकुमार आणि साक्षी मलिक यांना 'ब' श्रेणीत स्थान मिळाले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा महाराष्ट्राचा कुस्तीगीर राहुल आवारेला 'ड' गटात स्थान देण्यात आले आहे. बजरंग आणि पूजा धांडा यांनी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत पदके जिंकलेली असल्याने त्यांनी 'अ' श्रेणीत स्थान मिळवले आहे. ऑलिम्पिक पदकविजेते सुशील कुमार आणि साक्षी मलिक यांना गेल्या काही स्पर्धांमधील खराब कामगिरीमुळे 'अ' श्रेणीऐवजी 'ब' श्रेणीत स्थान मिळाले आहे. भारतीय कुस्ती महासंघ ही 'बीसीसीआय'नंतर खेळाडूंना करारबद्ध करणारी दुसरी क्रीडा संघटनाही ठरली आहे.अ श्रेणी (३० लाख) : बजरंग पुनिया, विनेश फोगट, पूजा धांडा ब श्रेणी (२० लाख) : सुशीलकुमार, साक्षी मलिक क श्रेणी (१० लाख) : संदीप तोमर, रितू फोगटड श्रेणी (५ लाख) : राहुल आवारे, उत्कर्ष काळे मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2PdkJOn

No comments

Powered by Blogger.