मध्य आणि हार्बरवर रविवारी सहा तासांचा ब्लॉक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईमध्य रेल्वेवर रविवार, २ डिसेंबर रोजी मशिद स्थानकातील जुना पादचारी पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यासाठी चारही मार्गांवर सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार असून, या सहा तासांच्या कालावधीत मशिद आणि सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही. हार्बरवरही सीएसएमटी ते वडाळा स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही. भायखळा आणि सीएसएमटीपर्यंत सर्व अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावर चालतील.मशिद स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडील (सीएसएमटी) दिशेने असलेल्या ३० वर्षांहून अधिक जुन्या पादचारी पुलावर हातोडा पडणार आहे. येथे नवीन पूल उभारण्यात येणार असल्याने रविवार, २ डिसेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान पाच-सहा तासांचे दोन ब्लॉक घेतले जाणार आहेत. या कालावधीत या पादचारी पुलावरील तिकीट आरक्षण केंद्रही बंद ठेवले जाईल. हा मेगाब्लॉक एकूण चार मार्गिकांवर चालेल. त्यात दोन हार्बर मार्गांचा समावेश असून, मध्य रेल्वेवरील दोन धीम्या मार्गांचा समावेश आहे. नवीन पुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामासाठी सीएसएमटी ते भायखळापर्यंत अप आणि डाऊन अशा दोन्ही धीम्या लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूल पाडण्यासाठी आणि नवीन पूल बांधण्यासाठी एकूण ४५ दिवसांचा कालावधी ठरवण्यात आला आहे. गाड्यांचे बदललेले वेळापत्रक-सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल स. १०.१४ आणि भायखळ्यासाठी स. १०.२२ वा. -सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल स. १०.१० आणि वडाळ्यासाठी स. १०.२८ची लोकल. -भायखळ्याहून सीएसएमटीसाठी स. ९.५० वाजता शेवटची लोकल सुटेल. ही लोकल सीएसएमटीला स. ९.५९ वा. पोहोचेल. -वडाळ्याहून स. ९.५२ वाजता शेवटची लोकल सुटून सीएसएमटीला स. १०.१० वा. पोहोचेल. प. रेल्वेवर रविवारी ब्लॉक नाहीपश्चिम रेल्वेवर रविवार, २ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्याऐवजी आज, शनिवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० पर्यंत वसई ते विरार स्थानकांदरम्यान धीम्या गतीच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत काही लोकल वसई ते विरारदरम्यान जलद मार्गांवर चालतील. त्यामुळे लोकल सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2zzFcYE

No comments

Powered by Blogger.