जाणून घ्या... आजपासून 'या' गोष्टी बदलणार
नवी दिल्ली: आज, एक डिसेंबरपासून काही नियमांमध्ये बदल होत आहेत. त्या बदलांचा दैनंदिन जीवनावर बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बदलांची माहिती करून घेणे आवश्यक आहे; जेणेकरून भविष्यात अडचणींचा समाना करावा लागणार नाही. सर्वांत महत्वाचे म्हणजे स्टेट बँकेतर्फे दोन नियमांमध्ये बदल करण्यात येत असून, ते पेन्शनधारकांसाठी अत्यंत उपयोगी आहेत. नेमके बदल कोणते याचा घेतलेला आढावा....१. तर बंद होईल नेटबँकिंग सेवा...स्टेट बँकेच्या ग्राहकांना भविष्यात नेटबँकिंग सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर, त्यांना आपला मोबाइल क्रमांक पुन्हा रजिस्टर करावा लागणार आहे. या प्रक्रियेची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंतच आहे. ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक न दिल्यास एक डिसेंबरपासून त्यांना इंटरनेट बँकिंग सेवेला मुकावे लागणार आहे. २. करा 'योनो'चा वापरस्टेट बँकेतर्फे ३० नोव्हेंबरपासून 'एसबीआय बडी' ही सेवा बंद करीत आहे. या सेवेच्या ऐवजी 'योनो' (YoNo) अॅपचा उपयोग करावा लागणार आहे. त्यामुळे 'एसबीआय बडी'मध्ये काही रक्कम ठेवली असेल, तर ती त्वरित काढून घेणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०१५मध्ये बँकेने 'एसबीआय बडी' हे अॅप तेरा भाषांमध्ये सादर केले होते. ३. प्रमाणपत्र सादर करापेन्शनरांना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात जिवंत असल्याचा पुरावा (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत जमा करावा लागतो. यंदासाठीही ही मुदत ३० नोव्हेंबरलाच संपणार आहे. असे न केल्यास पेन्शन थांबण्याची शक्यता आहे. ४. पेन्शन कर्जाचे प्रक्रिया शुल्कस्टेट बँकेच्या शाखांतून पेन्शनची रक्कम काढणाऱ्या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संरक्षण विभागाच्या ७६ वर्षांपर्यंतच्या पेन्शनधारकांना एक डिसेंबरपासून पेन्शनवर कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) द्यावी लागणार आहे. या मंडळींसाठी बँकेने एका योजनेंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत प्रक्रिया शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे. ५. ड्रोनचा वापर कायदेशीरआज, एक डिसेंबरपासून देशात ड्रोनच्या वापरास कायदेशीर परवानगी मिळणार आहे. नागरी हवाई मंत्रालयाने या संदर्भातील धोरण तयार केले आहे. मात्र, त्यासाठी ड्रोनच्या मालकांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी अॅपची निर्मिती करण्यात आली असून, त्याद्वारे डिजिटल परमिट घ्यावे लागणार आहे. ६. प्लेसमेंट सीझन सुरूआयआयटी मद्रासमध्ये आज, एक डिसेंबरपासून नव्या रोजगारसंधी निर्माण होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३२६ कंपन्यांनी ४९० नोकऱ्यांसाठी नोंदणी केली आहे. कॅम्पस प्लेसमेंटचा पहिला टप्पा एक डिसेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2PeLGkK
from Maharashtra Times https://ift.tt/2PeLGkK
Post a Comment