बिल्डरांना दणका; बांधकामाचा दर्जाही 'रेरा'कक्षेत
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईघराचा ताबा ग्राहकाला वेळेत देण्याबाबत बिल्डरांवर वचक ठेवण्यास प्राधान्य देणाऱ्या महारेरा प्राधिकरणाने आता घरांच्या दर्जाकडेही लक्ष देण्याचे ठरवले आहे. बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साधनसामग्रीच्या दर्जाचा अहवाल संबंधित बिल्डरच्या इंजिनीअरने 'रेरा'ला देणे बंधनकारक ठरवले आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाची घरे देणाऱ्या बिल्डरांवर धाक निर्माण होणार आहे.राज्यात 'रेरा'ची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत गृहनिर्माण उद्योगाला शिस्त लावण्यात रेरा प्राधिकरणाला यश आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या रेरा प्राधिकरणाचा नावलौकिक वाढला आहे. आता प्राधिकरणाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. बांधकामाच्या दर्जाकडे लक्ष पुरवण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. वास्तविक मूळ रेरा कायद्यात बांधकामाच्या दर्जाचा उल्लेख नाही. मात्र प्राधिकरणाने विशेष अधिकारात कायद्यात तरतूद करून घेतली आहे. बांधकामाच्या दर्जाबाबतही सजग असणारे रेरा हे भारतातील पाहिले प्राधिकरण ठरले आहे. आतापर्यंत व्यावसायिकांना रेरा तीन प्रकारची प्रमाणपत्रे देत असे. त्यात आता इंजिनीअरतर्फे दिल्या जाणाऱ्या आणखी एका प्रमाणपत्राचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रमाणपत्र खास करून बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याविषयी असेल. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणता माल वापरला, त्याचे प्रमाण किती होते, दर्जा काय होता, याची तपासणी करून तसा अहवाल इंजिनीअरने 'रेरा'ला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रकाराला आता आळा बसण्याची अपेक्षा आहे. प्लम्बर, वायरमन, पेंटर, गवंडी, बार बेंडर (जाड सळया वाकवणारे कामगार), सुतार, टाइल्स बसवणारे कारागीर आदी आठ प्रकारातील कारागीर 'रेरा'च्या कक्षेत येणार आहेत. त्यामुळे जुजबी ज्ञान असणाऱ्या कारागिरांकडून निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या बिल्डरांना अशी हेराफेरी करता येणार नाही. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2zxLjgo
from Maharashtra Times https://ift.tt/2zxLjgo
Post a Comment