हनुमान आदिवासीच, नंदकुमार साई यांचा दावा

वृत्तसंस्था, नवी दिल्लीभगवान हनुमान हे दलित असल्याच्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच, हनुमान हे आदिवासी असल्याचा दावा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साई यांनी केला आहे.लखनौ येथे एका कार्यक्रमात बोलताना साई यांनी हे उद्गार काढले. 'प्रभू रामचंद्रांच्या सेनेमध्ये वानर, अस्वले, गिधाडे होती, असे म्हटले जाते. ओराओन जमातीमध्ये 'तिग्गा' हे गोत्र असून कुरुख भाषेतील या शब्दाचा अर्थ वानर असा होतो. मी ज्या जमातीचा भाग आहे, त्या कंवर या जमातीमध्ये 'हनुमान' हे गोत्र असते. त्याचप्रमाणे अनेक अनुसूचित जातींमध्ये 'गिद्ध' म्हणजेच गिधाड हे गोत्र असते. त्यामुळे हे सर्वजण आदिवासी जमातींमधील होते आणि त्यांनी प्रभू रामांना युद्धात मदत केली, असे मला वाटते,' असे साई म्हणाले.याआधी आदित्यनाथ यांनी मंगळवारी राजस्थानातील अलवर येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना हनुमान हे मागासवर्गीय असल्याचे उद्गार काढले होते. 'हनुमान वनात राहणारे, दलित होते. बजरंग बलींनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्व भारतीय समाजांना एकत्र आणण्याचे काम केले,' असे आदित्यनाथ म्हणाले होते. मात्र या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आदित्यनाथ यांनी तीन दिवसांत माफी मागावी, अशी मागणी करणारी नोटीस राजस्थानातील एका उजव्या गटाने त्यांना पाठवली होती. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2zwOEMn

No comments

Powered by Blogger.