मुंबई: पालिका शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबई महापालिकेच्या शाळांतील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरमहा आठ सॅनिटरी नॅपकिन विद्यार्थिनींना दिले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या मुलींना दिलासा मिळणार आहे. नॅपकिनसाठी प्रशासनाला सहा कोटी ६१ लाख रुपये खर्च येणार आहे.पालिका शाळांतील सहावी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना २०१८ ते २१ या शैक्षणिक वर्षात सॅनिटरी नॅपकिन व डिस्पोजेबल पाऊचचा व्हेंडिंग मशिनद्वारे पुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीत मांडला. यावर विशाखा राऊत यांनी सहावीऐवजी पाचवीपासूनच्या सर्व मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात यावेत, अशी मागणी उपसूचनेद्वारे केली. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने ही उपसूचना एकमताने मंजूर झाली. त्यामुळे पाचवी ते आठवीच्या सुमारे ४७ हजार ९४ मुलींना १ कोटी १३ लाख दोन हजार ५६० सॅनिटरी नॅपकिन आता उपलब्ध होणार आहेत. 'नॅपकिनचा नमुना दाखवला नाही'मे. अरगस इलेक्ट्रॅानिक्स सिक्युरिटी सिस्टिमस् प्रा. लि. या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. मुंबईतील २५ विभागनिहाय शाळांमध्ये हे व्हेंडिंग मशिन बसवले जाणार आहे. मशिनची देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे. पालिका खरेदी करणार असलेले सॅनिटरी नॅपकिन दुप्पट दराने घेतले जाणार असून या नॅपकिनचा नमुना (सॅम्पल) प्रशासनाने दाखवलेला नाही. त्यामुळे या नॅपकिन खरेदीवर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2P9uaON

No comments

Powered by Blogger.