भारतानं ऑस्ट्रेलियाला २३५ धावांत गुंडाळलं
अॅडलेड: अॅडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं आणि ऑस्ट्रेलियाचा डाव २३५ धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळं भारताला १५ धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणाऱ्या ट्रेविस हेडनं ७२ धावा केल्या. शमीनं दोन चेंडूंवर हेड आणि जोश हेजलवुडला बाद केलं. या दोघांचे झेल विकेटकीपर ऋषभ पंत यानं पकडले. एका डावात सहा झेल टिपण्याची कामगिरी पंतनं केली. भारताकडून पंत हा कसोटीत सर्वाधिक झेल टिपणारा विकेटकीपर ठरला आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताला पहिल्या डावात २५० धावांत गुंडाळलं होतं. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २३५ धावांवर रोखलं असून, भारताकडे १५ धावांची आघाडी आहे. आता अॅडलेड कसोटी जिंकण्याची संधी भारताकडे आहे.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2L7ZFZq
from Maharashtra Times https://ift.tt/2L7ZFZq
Post a Comment