कल्याण-कसारा रेल्वे अर्धा तास उशिराने

कल्याण:मध्य रेल्वेवरील खडवली-वासिंद दरम्यान आज सकाळी झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी कल्याण ते कसारा दरम्यानची वाहतूक अर्धा तास उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्यावेळी हा बिघाड झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास खडवली ते वासिंद स्थानकादरम्यान हा तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रशासनानं तातडीनं हालचाल करून दुरुस्तीचं काम हाती घेतलं. हे काम आता पूर्ण झालं असलं तरी गाड्या अजूनही अर्धा तास उशिरानं धावत आहेत. ऐन कार्यालयीन वेळेतच वाहतूक कोलमडल्यानं चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2BYgliU

No comments

Powered by Blogger.