२० टक्के गर्भवती एचआयव्ही तपासणीविना
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईएचआयव्हीसंदर्भात वैद्यकीय तसेच समुपदेशाच्या पातळ्यांवर सुरू असलेल्या जाणीवजागृतीमुळे एचआयव्हीचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांमध्ये घट झाली असली तरीही अद्याप राज्यातील वीस टक्के गरोदर महिलांना एचआयव्हीच्या तपासण्यांपासून अद्याप दूर आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागांतर्गत केलेल्या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील गर्भवती महिलांच्या एड्स तपासण्यासंदर्भातील नोंदीमध्ये हे दिसून आले आहे.खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये नोंद करण्यात येणाऱ्या गर्भवती महिलांना त्यांच्यासह बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने काही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. त्यातील रक्तचाचण्यांमध्ये एचआयव्हीसंदर्भातील चाचणीचाही समावेश असतो. एक एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील १३ लाख ४२ हजार ३३५ गर्भवती महिलांची नोंद करण्यात आली आहे. या महिलांमधील ४ लाख ३८ हजार ६२१ गर्भवती महिला शहरी भागातल्या आहेत तर ९ लाख ३७ हजार ७१४ महिला या ग्रामीण भागातल्या आहेत. या कालावधीमध्ये १० लाख ७८ हजार ६४६ महिलांची एचआयव्हीसाठी तपासणी करण्यात आलेली आहे. त्यात शहरी भागातल्या २ लाख ९० हजार १८ तर ग्रामीण भागातल्या ७ लाख ८८ हजार ६२८ जणींची तपासणी करण्यात आल्याचे हे सर्वेक्षण सांगते. नोंदणी झालेल्या मात्र प्रत्यक्ष तपासणी न केलेल्या वीस टक्के महिला आहे. राज्यात शहरांपेक्षा ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. शहरातील ३४ टक्के तर ग्रामीण भागातील १२.७ टक्के महिलांनी एचआयव्हीसाठी तपासणी केलेली नाही.राज्यात एकत्रितरित्या एचआयव्हीची तपासणी न केलेल्या गर्भवती महिलांचे प्रमाण वीस टक्के आहे. एचआयव्हीची तपासणी झालेल्या गर्भवती महिलांमधील एकूण ७ हजार २१५ जणींना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आईकडून बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होण्याची शक्यता पूर्वी दाट होती. मात्र आता अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे एचआयव्हीचा संसर्ग बाळाला होऊ नये यासाठी इंजेक्शन्स दिली जातात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण रोखता येते. एचआयव्हीसंदर्भातील तपासण्या केल्या नाही तर हा धोका कायम राहतो, त्यामुळे प्रत्येक गर्भवती मातेला या चाचण्या करण्याची माहिती देण्यात यावी.डॉ. विशाखा म्हात्रे, स्त्रीरोगतज्ज्ञ हे काही महत्त्वाचेशहरांपेक्षा ग्रामीण भागामध्ये एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण सहा पटचाचणी झालेल्या चाप महिलांपैकी एकीला एचआयव्हीचे निदान झालेले दिसते.२०१७-१८ मधील आकडेवारीनोंदणी झालेल्या गर्भवती महिला - २१ लाख ८० हजार ६७०तपासणी झालेल्या महिला -१६ लाख ९९ हजार ५८९निष्कर्ष - २२ टक्के महिला तपासणीशिवाय२०१६ -१७ मधील आकडेवारीनोंदणी झालेल्या गर्भवती महिला - २१ लाख ८५ हजार ७८९तपासणी झालेल्या महिला - १२ लाख ६७ हजार ५०७फरक - ९ लाख १८ हजार २९१निष्कर्ष - ४२ टक्के महिला तपासणीशिवायमुंबई एड्स नियंत्रण सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार..२०१३-१४ मध्ये २५५ गर्भवती महिलांना एड्स ही संख्या २०१७-१८ मध्ये १४९ देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये एड्सचं प्रमाण ५४ टक्क्यांनी कमी झाले समलिंगी संबंधांमुळे होणाऱ्या एड्सच्या प्रकरणांमध्ये २० टक्क्यांची घट मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2PcCBsK
from Maharashtra Times https://ift.tt/2PcCBsK
Post a Comment