सुनील ग्रोवरने कपिलला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा!
मुंबई:अभिनेता कपिल शर्मासोबत भांडण झाल्यानंतर त्याचा शो सोडणारा विनोदी अभिनेता सुनील ग्रोवरने कपिल शर्माला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बरं, तो केवळ शुभेच्छाच देऊन थांबला नाही. तर त्याने या निमित्ताने कपिलचं भरभरून कौतुकही केलं आहे. त्यामुळे सुनील-कपिलमधील दुरावा दूर झाल्याचं बोललं जात आहे.सुनील ग्रोवर सध्या 'कानपूरवाले खुरानाज' या आगामी कॉमेडी शोमध्ये झळकणार आहे. या शोच्या लॉन्चिंगवेळी त्याला पत्रकारांनी घेरलं आणि कपिलच्या लग्नाबद्दल विचारलं. त्यावेळी सुनीलने कपिलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. 'कपिलचं लग्न ठरल्याचं ऐकून मला खूप आनंद झाला. आम्ही एकत्र काम केलंय. आता त्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. त्यानं प्रेक्षकांना सतत हसवत रहावं हीच माझी इच्छा आहे. तो लोकांचं मनोरंजन करत राहील याचा मला विश्वास आहे, कारण तो कपिल खूप प्रतिभाशाली आहे,' असं सुनील म्हणाला. कपिल येत्या १२ तारखेला गिन्नी चतरथ सोबत जालंधरमध्ये विवाहबद्ध होणार आहे.विशेष म्हणजे सुनीलचा हा नवीन शो आणि कपिलचा शो एकाच वेळी प्रसारित होणार आहे. 'कानपूरवाले खुरानाज' येत्या १५ डिसेंबरपासून स्टार प्लसवर प्रसारित होणार असून या शोच्या पहिल्याच भागात 'सिम्बाचा' दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता रणवीर सिंह दिसणार आहेत.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2PoTS20
from Maharashtra Times https://ift.tt/2PoTS20
Post a Comment