लग्नासाठी प्रियांकाची निकला बळजबरी; वाद पेटला
मुंबईःप्रियांका आणि निक जोनास गेल्याच आठवड्यात विवाह बंधनात अडकले. निक-प्रियांकावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना 'द कट' या मासिकात प्रकाशित झालेल्या लेखात प्रियांका-निकच्या नात्यावर टीका करण्यात आली होती. प्रियांका 'ग्लॉबल स्टार' नाही तर 'ग्लॉबल स्कॅम आर्टिस्ट' आहे. तसंच तिन निकच्या इच्छेविरुद्ध त्याला लग्न करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोपही लेखिका मारिहा स्मिथनं केला आहे. लेख प्रकाशित होताच प्रियांकाच्या जवळच्या लोकांनी मासिकाला चांगलंच सुनावलं होत. त्यानंतर आता स्वतः प्रियांकानंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'मला याबाबत काहीच बोलायचं नाही. हे सगळं माझ्या कल्पनेबाहेरचं आहे. मी आता खूप खुश आहे. या गोष्टींचा मला काही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया प्रियांकानं दिली. त्यानंतर निक जोनासचा भाऊ जो जोनास आणि त्याची पत्नी सोफी टर्नर यांनीही लेखाबाबत नाराजी व्यक्त केली होती. Is priyanka chopra and Nick Jonas Love For Real या मथळ्याखालील प्रसिद्ध झालेल्या लेखात प्रियांकानं निकला बळजबरीनं लग्न करण्यासाठी भाग पाडलं आहे. तिला हॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण करायचं होतं यासाठी तिनं निकचा वापर केला. मासिकावर टीका होताच लेखामुळं वाचकांची माफी मागत 'द कट'नं हा लेख वेबसाइटवरून काढून टाकला आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2SujPix
from Maharashtra Times https://ift.tt/2SujPix
Post a Comment