पिंपरी: पत्नीकडून छळ; तरुणाची आत्महत्या
पिंपरी:आत्महत्येची धमकी देत मानसिक आणि शारीरिक छळ करून पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या २१ वर्षीय महिलेला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. जय तेलवाणी (वय २५) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी जयची पत्नी तृप्ती हिला अटक केली आहे. या प्रकरणी कांचन देवीदास तेलवाणी (काळेवाडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून चिखली पोलिसांनी जयची पत्नी तृप्ती (वय २१) हिला अटक केली आहे. मार्च २०१८ ते १३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत तृप्तीने जयचा घरगुती कारणे आणि त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत छळ केला. पैसे न दिल्याने त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. इतकंच नाही तर आत्महत्येची धमकी देत त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. पतीला कॅन्सर झाला आहे, असा दुसऱ्या आवाजात व्हिडिओ बनवून तो त्याच्या मित्रमंडळींना दाखवून त्याची बदनामी केली. या त्रासाला कंटाळून जयनं नोव्हेंबरमध्ये आत्महत्या केली, असं तक्रारीत नमूद केलं आहे. या प्रकरणी जयची पत्नी तृप्तीला अटक केली असून, अधिक तपास फौजदार रत्ना सावंत करत आहेत. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2rihtrx
from Maharashtra Times https://ift.tt/2rihtrx
Post a Comment