रस्तेकामाचे २२३ कोटींचे प्रस्ताव
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई स्थायी समितीच्या या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत रस्तेकामाचे तब्बल २२३ कोटी रुपयांचे १४ प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. यामध्ये अधिकतर कामे पश्चिम उपनगरातील आहेत. पाऊस जाऊन चार महिने उलटल्यानंतरही रस्त्यांवर खड्डे कायम असल्याने या प्रस्तावावरून विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.रस्त्यांचे डांबरीकरण पुनर्पृष्ठीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, रस्ते-पदपथांची दुरुस्ती, लहान रस्त्यांची पक्की फरसबंदी ही कामे करण्यात येणार आहेत. २२३ कोटींच्या कामांमध्ये सिमेंट काँक्रीटीकरण-८९ कोटी, रस्त्यांचे डांबरीकरण व पुनर्पृष्ठीकरण-१९ कोटी आणि डांबरीकरण करण्याची ४८ कोटी रुपयांची कामे आहेत. तर, उर्वरित कामे ही रस्त्यांची पक्की फरसबंदी करणे, पदपथ दुरुस्ती, पॅसेजचे सिमेंट काँक्रीटीकरण यासाठी ४२ कोटींची कामे केली जाणार आहेत. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2rcPJ7M
from Maharashtra Times https://ift.tt/2rcPJ7M
Post a Comment