हनुमान आर्य होते, मंत्री सत्यपाल सिंहांचा शोध

बागपत, उत्तर प्रदेशबजरंग बली हनुमान कुठल्या जातीचे होते यावरून आता उत्तर प्रदेशात राजकीय चढाओढ रंगली आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्यानंतर राष्ट्रीय अनुसुचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय आणि आता केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी बजरंग बली हनुमान कुठल्या समाजाचे होते हे सांगितलं आहे. 'भगवान राम आणि हनुमान यांच्या युगात कुठलीही जाती व्यवस्था नव्हती. कुणीही दलित, वंचित किंवा शोषित नव्हतं. वाल्मिकी रामायण किंवा रामचरित मानस वाचल्यावर हे तुम्हाला लक्षात येईल. बजरंग बली हनुमान हे आर्य होते. त्यावेळी फक्त आर्यच होते आणि हनुमान हे आर्यांमधील महापुरुष होते', असं सत्यपाल सिंह म्हणालेत.यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजरंग बली हनुमान हे दलित होते, असं वक्तव्य केलं होतं. तर राष्ट्रीय अनुसुचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान आदिवासी होते, असं म्हटलंय.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2PaMEP1

No comments

Powered by Blogger.