अमेरिकाः माजी अध्यक्ष सिनिअर बुश यांचे निधन

वॉशिंग्टनअमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सिनिअर बुश म्हणून ते ओळखले जायचे. अमेरिकेला शीतयुद्धातून बाहेर काढण्यात त्यांची मोठी मदत झाली होती. गेल्या एप्रिलमध्ये त्यांची पत्नी बारबरा बुश यांचं ९२व्या वर्षी निधन झालं.सिनिअर बुश यांच्या निधनाची बातमी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कुटुंबाच्या प्रवक्त्याकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. त्यांच्या निधनाने कुटुंब शोकात. अतिशय उमद्या व्यक्तिमत्त्वाचे ते होते. मुली आणि मुलांवर त्यांचं खूप प्रेम होतं, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2PegbYa

No comments

Powered by Blogger.