जादुगाराच्या मदतीने कर्नाटक सरकार पाडणार!

बेंगळुरू, शिमोगाकर्नाटक सरकार पाडण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पांनी जादुगाराची मदत घेतली आहे. त्यासाठी ते केरळला गेलेत, अशी चर्चा कर्नाटकमध्ये रंगली आहे. पण या अफवा असल्याचं त्यांचे पुत्र आणि शिमोगामधील खासदार बिवाई राघवेंद्र यांनी सांगितलं. कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्या पूर्वी विश्रांतीसाठी त्यांनी ब्रेक घेतला आहे, राघवेंद्र यांनी सांगितलं. तर खांद्याच्या दुखण्यावर नैसर्गिक उपचार करण्यासाठी ते केरळला गेलेत. ते शुक्रवारी उपचारासाठी निघालेत. ४ डिसेंबरला परततील, असं येडियुरप्पा यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं.पण काँग्रेस नेत्यांचं वेगळचं म्हणणं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडण्याकरता येडियुरप्पा जादुगाराचा सल्ला घेण्यासाठी केरळला गेले, असा आरोप काँग्रेसच्या नेत्याने केला आहे. उडुपीतील विश्वासू खासदारासोबत येडियुरप्पा जादुगाराचा सल्ला घेण्यासाठी केरळला गेले. अलिकडेच शिमोगा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत येडियुरप्पांच्या मुलगा राघवेंद्र यांचा विजय झाला. पण मतांचं अंतर कमी असल्याने ते जादुगाराचा सल्ला घेण्यासाठी गेले, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार गोपालकृष्ण यांनी केला आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2zx5v1O

No comments

Powered by Blogger.