सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या, BSF चिंतेत?

नवी दिल्लीःराजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने चिंता व्यक्त केली आहे. पाक सीमेवरील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या चिंताजनक असल्याचं बीएसएफने म्हटलं आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला एक अहवाल सादर करण्यात आला आहे. मुस्लिम समाजात धार्मिक कट्टरता वाढत असून पारंपरिक राजस्थानी ओळख मागे पडत चालली आहे. तसंच हिंदू आणि मुस्लिम समाजातील संवादही कमी होत चालला असल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. जैसलमेर भागात राहणाऱ्या नागरिकांच्या पेहरावात आणि केशरचनेत अमुलाग्र बदल होऊन त्यातून राजस्थानची छबी नाहीशी होत चालली आहे, असं धक्कादायक निरीक्षण सीमा सुरक्षा दलानं नोंदवलं आहे. सीमा भागातील मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत तब्बल २० ते २२ टक्के वाढ झाली आहे. इतर धर्मियांची लोकसंख्या ८ ते १० टक्क्यांनी वाढल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या अहवालात म्हटलं आहे. मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येवरून या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्यातरी या भागात धार्मिक तेढ नाहीये. परंतु, तेढ निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं सीमा सुरक्षा दलानं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. सीमा सुरक्षा दलाकडून अशा प्रकारचे सर्वेक्षण केलं जातं. जैसलमेरमधील मोहनगड, नचना, बहला, पोखरण, साम, तनोट या भागात हा सर्वे करण्यात आला. त्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयासह अन्य यंत्रणांना सुपूर्द करण्यात आला, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख रजनीकांत मिश्रा यांनी दिली.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2PeLSR0

No comments

Powered by Blogger.