अलास्का ७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरलं

केनाईःअलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीप ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरला. भूकंपानंतर 'नॅशनल ओशियनिक अॅण्ड अॅटमोस्फियरिक एडमिनिस्ट्रेशन' यांच्याकडून त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, उत्तर अमेरिकेतील कॅनेडियन क्षेत्राचं मूल्यांकन केल्यानंतर त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला.भूकंपाचं केंद्र एंकोरेज या शहराच्या उत्तरेला ७ मैलावर होतं. भूकंपानंतर वीजपुरवठा खंडीत झाला आहे. याचा फटका सुमारे १० हजार नागरिकांना बसला आहे. या भूकंपानंतर सभोवतालच्या परिसरातील इमारती, पूल कोसळले. रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की, सुमारे ४० वेळा कंपनं जाणवली. एंकोरेज आणि परिसरातील क्षेत्रात सुमारे ४ लाख नागरिक वास्तव्य करतात, अशी माहिती मिळाली आहे. पण सुदैवाने अद्याप कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2zxLjwU

No comments

Powered by Blogger.