नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, ३ कोटीची वाहने जाळली
गडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत एटापल्ली तालुक्यात तीन कोटींची वाहने जाळली आहेत. रस्ते बांधणीसाठी आणलेली वाहनं नक्षलवाद्यांनी पेटवली. एटापल्ली तालुक्यात रस्त्यांच्या कामावर असलेली १० जेसीबी आणि ५ ट्रॅक्टर नक्षलवाद्यांनी पेटवली. एटापल्ली तालुक्यात वट्टेपल्ली ते गट्टेपल्ली दरम्यान ही घटना घडली. रस्ते कामावर असलेल्या मजुरांनाही नक्षलवाद्यांनी रात्री उशिरापर्यंत डांबून ठेवलं होतं. काल संध्याकाळची ही घटना आहे. आजपासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2P6ZOg1
from Maharashtra Times https://ift.tt/2P6ZOg1
Post a Comment