
उत्तराखंडमधील रामनगर येथे एका हत्तीनं चारचाकीवर हल्ला केल्याची घटना ३ डिसेंबर रोजी घडली. मोहन मार्ग परिसरात ही घटना घडली. काही पर्यटक हत्ती पाहण्यासाठी येथे थांबले होते. मात्र, अचानक एक हत्ती त्यांच्यावर चाल करून आला. वेळीच सर्व जण गाडीतून बाहेर पडले. वन अधिकाऱ्यानं हवेत गोळीबार केल्यावर हत्तीनं तेथून पळ काढला.
from Maharashtra Times https://ift.tt/2FZNkYd
Post a Comment