विराट शॉर्ट्स घालून टॉससाठी गेला, चाहते भडकले

सिडनी: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोल झाला. ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्याला गुरुवारी सुरुवात होण्याआधी नाणेफेकीसाठी विराट शॉर्ट्स घालूनच मैदानात आला. त्याचं हे वागणं क्रिकेट चाहत्यांना खटकलं. त्यांनी विराटला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली. बीसीसीआयनं अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पहिल्या सराव सामन्याच्या नाणेफेकीचा फोटो शेअर केला होता. त्यात कोहली आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाचा कर्णधार सॅम व्हाइटमन दिसत आहे. नाणेफेकीवेळी कोहली शॉर्ट्समध्येच मैदानात आला होता. यावरून क्रिकेट चाहत्यांनी कोहलीला चांगलंच सुनावलं. कोहलीचे हे वागणे क्रिकेटचा अनादर करणारे आहे, असं काहींनी म्हटलं. पाकिस्तानचा कर्णधार फखर झमान यानं आशिया कपमध्ये नाणेफेकीवेळी टोपी नीट घातली नाही म्हणून सुनील गावसकर यांनी त्याच्यावर टीका केली होती, त्याची आठवणही क्रिकेट चाहत्यांनी यावेळी करून दिली. विराटनं क्रिकेटच्या परंपरांचं पालन केलं पाहिजे. नाणेफेकीला जाताना कर्णधार शॉर्ट्स घालून जात नाहीत, असं एका यूजरनं म्हटलं आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2PeV7Ru

No comments

Powered by Blogger.