महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण द्याः ओवेसी
अहमदाबाद महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पाटीदार समाजाने आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता राजपूत आणि ब्राह्मण समाजानेही आरक्षणाची मागणी केले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आरक्षण द्या अशी मागणी AIMIM चे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी आज केली. आरक्षण न दिल्याने महाराष्ट्रातील मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे, असा आरोप त्यांनी ट्विटरवरून केला आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे. हा त्यांचा अधिकार आहे. रोजगार आणि शिक्षणात मागास मुस्लिमांना आरक्षणापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल, असे ओवेसी म्हणाले. मुस्लिम समाजात मागास जाती आहेत त्या अनेक वर्षांपासून गरिबीत आपले जीवन जगत आहेत. आरक्षण देऊन या समाजाला मुख्य प्रवाहात आणता येईल, ही मागणी मी वेळोवेळी केली आहे, असं म्हणत त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे का? असा सवाल विचारून त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येत ११.५ टक्के मुस्लिमांची संख्या आहे. यातील ६० टक्के मुस्लिम दारिद्रेरेषेखाली आपले जीवन जगत आहेत, असा दावा ओवेसी यांनी यावेळी केला. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2DPE8CW
from Maharashtra Times https://ift.tt/2DPE8CW
Post a Comment