घटस्फोटासाठी त्यानं पत्नीला दिलं HIV सलाईन
म. टा. प्रतिनिधी, पिंपरीघटस्फोट मिळवण्यासाठी डॉक्टर पतीने विवाहितेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात घडला. तसेच हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला.पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय विवाहितेने याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पडवळ नगर, थेरगाव येथे राहणारा तिचा डॉक्टर पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा विवाह मे 2015 मध्ये झाला. त्यानंतर कुटुंबातील आरोपी यांनी आपसात संगनमत करून व्यवसाय करण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्याची वेळोवेळी मागणी केली. त्यापैकी काही पैसे प्राप्तही करून घेतले. मात्र त्यांची मागणी वाढत गेल्याने फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे तिला शिवीगाळ करून मारहाणही करण्यात आली. पैसे मिळत नसल्याने तिचा घटस्फोटासाठी छळ करण्यात आला. संबंधित महिला आजारी असताना तिच्या पतीने घरीच तिला सलाईन दिले होते. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. काही दिवसांनी तिला एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले. पतीनेच सलाईन मधून विषाणू सोडल्याचे संबंधित महिलेचे म्हणणं आहे. फौजदार संगीता गोडे तपास करीत आहेत.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2PeUVBK
from Maharashtra Times https://ift.tt/2PeUVBK
Post a Comment