अभिनव बिंद्राला नेमबाजीतील सर्वोच्च सन्मान

नवी दिल्ली :ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनकडून (ISSF) अभिनवला 'ब्ल्यू क्रॉस' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून हा सन्मान मिळवणारा अभिनव हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. आज या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.आयएसएसएफ या आंतरराष्ट्रीय नेमबाजी संस्थेकडून देण्यात येणारा 'ब्ल्यू क्रॉस' हा सर्वोच्च सन्मान आहे. नेमबाजीतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. ३६ वर्षीय अभिनवने या पुरस्काराला गवसणी घालून भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे.हा पुरस्कार माझ्यासाठी खास असून या सन्मानाने मी सद्गदित झालो आहे, अशी भावना अभिनव बिंद्राने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमशी बोलताना व्यक्त केली. अॅथलिट्स आणि आयएसएसएफसाठी काम करण्याचा अनुभव फार काही शिकवणारा होता, असेही अभिनव पुढे म्हणाला. दरम्यान, अभिनवने नेमबाजी कारकीर्दीत एक ऑलम्पिक सुवर्णपदक (२००८), एक वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्णपदक (२००६), राष्ट्रकुल स्पर्धांत ७ सुवर्णपदकं तसेच आशिया स्पर्धांत ३ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. अभिनवला २००० मध्ये अर्जुन पुरस्कार, २००१ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि २००९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. २०१६ मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिल्यानंतर ३३व्या वर्षी अभिनवने निवृत्तीचा निर्णय घेतला होता.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2E5RHPG

No comments

Powered by Blogger.