अरुणाचल प्रदेशः राज्यपाल आले मदतीला धावून

इटानगरःएका गर्भवती महिलेला आपल्या हेलिकॉप्टरमधून नेऊन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तवांग येथील एका गर्भवती महिलेची प्रकृती अचानक अत्यवस्थ झाली. तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळणं आवश्यक होतं. राज्यपाल मिश्रा यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ त्या महिलेला आपल्या हेलिकॉप्टरमधून तवांग येथून इटानगर येथे नेलं आणि वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले.राजभवनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तवांग येथे एका कार्यक्रमाला राज्यपाल मिश्रा गेले होते. यावेळी मुख्यमंत्री पेमा खांडू आणि एक स्थानिक आमदार गर्भवती महिलेच्या अत्यवस्थ प्रकृतीबाबत चर्चा करत होते. पुढील तीन दिवसात तवांग आणि गुवाहाटी दरम्यान हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध नसल्याची माहिती आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यांची चर्चा ऐकताच राज्यपाल मिश्रा यांनी पुढाकार घेतला आणि गर्भवती महिला आणि तिच्या पतीला आपल्या हेलिकॉप्टरमधून नेण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टरमध्ये जागा होत नसल्याचं लक्षात येताच राज्यपालांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांना तवांग येथे राहण्यास सांगितलं.घटनेत आलं ट्विस्टसरळ गेलं तर ते आयुष्य कुठलं. राज्यपालांनी गर्भवती महिलेला मदत करून तिला वैद्यकीय उपचार मिळवून दिले. इतक्या सहज ही घटना घडली नाही. राज्यपालांच्या हेलिकॉप्टरनं तवांग येथून उड्डाण करताच हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्यासाठी ते तेजपूर येथे उतरवण्यात आलं. हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं. त्यामुळं ते हेलिकॉप्टर पुन्हा उड्डाण करू शकत नव्हतं. महिलेची प्रकृती खालावत चालल्याचं राज्यपालांच्या लक्षात आलं. राज्यपालांनी लगेचच तेजपूर येथील हवाई सेनेच्या तळावरून एक हेलिकॉप्टर मागवलं आणि महिला व तिच्या पतीला पुढे रवाना केलं. इटानगर येथे एक स्त्री रोग तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका उपस्थित राहतील, याची सोयही राज्यपालांनी केली. यानंतर राज्यपाल दुसऱ्या हेलिकॉप्टनं राजभवनात गेले. त्या महिलेनं सुदृढ बालकाला जन्म दिल्याची माहिती मिळताच राज्यपाल मिश्रा यांनी त्या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2FNWYgv

No comments

Powered by Blogger.