लष्करप्रमुखांचे पाक पंतप्रधानांना खडे बोल

पुणे: मैत्रीत भारतानं एक पाऊल पुढं टाकलं तर मी दोन पावले पुढे टाकीन, असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं होतं. त्यावर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पलटवार केला आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्ताननं एक पाऊल पुढे टाकून दाखवावं, असं आव्हान त्यांनी खान यांना दिलं. पाकिस्तान सकारात्मक पाऊल टाकत नाही, तोपर्यंत दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.पाकिस्तानला चर्चा हवी आहे तर त्यांनी आधी दहशतवाद रोखला पाहिजे, अशी भूमिका परराष्ट्र मंत्रालयानं घेतली होती. त्यानंतर लष्करप्रमुख रावत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत पाकिस्तान आणि इम्रान खान यांना लक्ष्य केलं. पाकिस्ताननं स्वतःला इस्लामिक देश केलं आहे. भारतासोबत चर्चा हवी असल्यास पाकिस्तानला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. तसं झालं तरच दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते, असं ते म्हणाले. रावत यांनी इम्रान खान यांनाही लक्ष्य केलं. तुम्ही एक पाऊल टाका, आम्ही दोन पावलं पुढे टाकू असं खान म्हणताहेत, पण त्यांच्या म्हणण्यातील विरोधाभास स्पष्ट आहे. त्यांच्याकडून एक तरी सकारात्मक पाऊल टाकायला हवं. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असं आमचं धोरण आहे, असं रावत म्हणाले.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2zAQfRo

No comments

Powered by Blogger.