दिल्ली: शेतकऱ्यांचा रामलीला ते संसद मोर्चा सुरू
नवी दिल्लीस्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या संसदेवरील धडक मोर्चाला सुरुवात झाली आहे. सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा मनात सरकारबद्दल प्रचंड रोष असून सर्वच राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे.देशभरातील २०७ शेतकरी संघटनांचा सहभाग असलेल्या या मोर्चाला रामलीला मैदानातून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली आहे. मोर्च्यासाठी आलेल्या आदिवासींनी मोर्चा सुरू होण्याआधी पारंपारिक नृत्य सादर केले. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. सरकार आश्वासनं देतं, पण त्याची पूर्तता करत नाही. आमच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय पण सरकारने अजूनही नुकसानभरपाई दिलेली नाही, अशी खदखद पुणे जिल्ह्यातून आलेल्या गणेश काठाळे या शेतकऱ्यानं व्यक्त केली. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजाणी झालीच पाहीजे... अन्यथा काही खरं नाही, अशी भावना पंजाबी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हा मोर्चा दुपारपर्यंत संसदेवर धडकणार असून तिथे किसान संसद भरणार आहे.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2Pbq6xx
from Maharashtra Times https://ift.tt/2Pbq6xx
Post a Comment