जिओनीचे अध्यक्ष जुगारात हरले १०० अब्ज
नवी दिल्लीःजुगाराच्या आहारी गेलेल्या माणसांची काय गत होते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जुगारात जिंकलं तर दिवाळी, नाहीतर दिवाळं याप्रमाणे अनेकजण उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणं आपण आजूबाजूला बघत असतो. मात्र, या जुगाराच्या आहारापायी जिओनी स्मार्टफोन कंपनी दिवाळखोरीत जाणार असल्याचं वृत्त आहे. सध्या कंपनी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची चर्चा आहे. कंपनीच्या या परिस्थितीला चेअरमन लिऊ लिरॉन असल्याची माहिती मिळाली आहे. झालंय असं की, जुगाराच्या आहारी गेलेले लिरॉन साइपेनमधील एका कॅसिनोमध्ये जुगार खेळायला गेले. परंतु, नशिबाचं चक्र फिरलं आणि ते तब्बल १० अरब युआन म्हणजेच भारतीय रुपयाप्रमाणे १ खर्व रुपये हरले. याबाबतची माहिती चीनच्या एका संकेतस्थळाकडून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर दुसरीकडे जिओनीचे चेअरमन लिरॉन यांनी आपण जुगारात १ खर्व रुपये हरल्याचं मान्य केलं आहे, असा दावा अॅड्रोइड अॅथोरिटीनं केला आहे. जिओनीनं आपल्या सप्लायर्सची बिले थकवली असून, सुमारे २० सप्लायर्सनी शेनजेन न्यायालयात कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. तत्पूर्वी, भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी जिओनीकडून भारतात ६.५ अब्ज रुपये गुंतवणूक होणार असल्याचं वृत्त यावर्षीच्या एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झालं होतं. भारतीय बाजारपेठेत पहिल्या पाच मोबाइल विक्रेत्यांमध्ये येण्याचं उद्दिष्ट कंपनीकडून निश्चित करण्यात आलं होतं. त्याच महिन्यात जिओनीनं 'जिओनी एफ २०५' आणि 'जिओनी एस ११' हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2BGqsZI
from Maharashtra Times https://ift.tt/2BGqsZI
Post a Comment