करिनाला माझी आई व्हायचं नाहीः सारा

मुंबई:अभिनेता सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंह आणि सैफची मुलगी सारा अली खान आगामी 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सारा सध्या 'केदारनाथ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. साराने पहिल्यांदाच मीडियासोबत संवाद साधला. माझ्यात आणि सावत्र आई करिनामध्ये आई-मुलीचं नाते नाही तर ते निखळ मैत्रीचं नातं आहे, असं सारानं म्हटलं आहे. सावत्र आई करिना आणि सारामध्ये असलेल्या नात्यांबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना तिनं दिलखुलास उत्तर दिले. करिना आणि माझ्यात आई-मुलीचं नातं नव्हे तर मैत्रीचे नातं आहे, असं ती म्हणाली. 'मी लहानपणापासूनच करिनाची मोठी चाहती आहे. करिना आणि मी खूप फ्रेंडली आहोत. करिनाला कधी माझी आई बनायचं नव्हतं आणि मी सुद्धा तिच्याकडे आई म्हणून कधी पाहत नव्हते. करिनाला मी आई म्हणावं यासाठी वडील सैफ यांचाही कधी दबाव नव्हता, असं ती म्हणाली. माझी आईदेखील करिना आणि माझ्यातील नात्यांशी सहमत आहे', असं सारा म्हणाली.'केदारनाथ' हा चित्रपट ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सारा आणि सुशांत सिंह राजपूत ही नवी जोडी या चित्रपटातून पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरनं केलंय. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2KHJMIZ

No comments

Powered by Blogger.