पंढरपूरः आत्महत्येची धमकी देणारा पोलीस बेपत्ता

पंढरपूरअधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून थेट सोशल मीडियात आत्महत्येची धमकीपत्र देणारा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल जगताप दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. यामुळे पोलीस विभाग हादरला आहे. पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व एक कर्मचारी वारंवार त्रास देतात. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असं पत्र कॉन्स्टेबल राहुल जगताप यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं. यानंतर तो गेल्या दोन दिवसापांसून बेपत्ता असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. पोलिसांनी जगतापचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा मिळालेला नाही. जगताप याचा मोबाइल देखील दोन दिवसापासून नॉट रिचेबल आहे.पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांमधील तणाव आणि बेबनाव या नित्याच्याच गोष्टी असल्या तरी एखाद्या कर्मचाऱ्याने थेट सोशल मीडियावर आत्महत्या करीत असल्याचं पत्र व्हायरल केल्याने याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे. राहुल जगताप हा वयाने लहान असून त्याला पत्नी आणि लहान मुलगा आहे. अशा स्थितीत त्याचा अजूनही शोध लागत नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. दरम्यान जगताप याचा शोध सुरू असून तो सापडल्यावर त्याच्याकडून माहिती घेऊन अहवाल गृहविभागाला दिला जाणार आहे. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवाडे यांनी सांगितलं. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2AE1KHp

No comments

Powered by Blogger.