भारताला झटका; पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीतून बाहेर
सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा सलामीचा स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ हा ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान जखमी झाला आहे. त्यामुळं तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही.सिडनी मैदानावरील सराव सामन्यावेळी पृथ्वी शॉ जखमी झाला आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळं तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या अॅडलेड कसोटीत खेळणार नाही, असं बीसीसीआयनं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया इलेव्हनचा सलामीचा फलंदाज मॅक्स ब्रायंट याचा झेल घेताना पृथ्वी मैदानावर जोरानं आपटला. त्यामुळं त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतरही तो डाव्या पायावर जोर देऊन उभा राहू शकला नाही. त्यामुळं त्याला स्ट्रेचरवरूनच मैदानाबाहेर नेलं. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2KH9VaA
from Maharashtra Times https://ift.tt/2KH9VaA
Post a Comment