गुजरात: ब्राह्मणांना आरक्षण द्या; OBC आयोगाकडे मागणी
अहमदाबाद: मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतल्यानंतर त्याचे पडसाद गुजरातमध्येही उमटू लागले आहेत. पाटीदारांनंतर तेथील ब्राह्मण आणि राजपूत समाजानंही आरक्षणाची मागणी केली आहे. ब्राह्मण समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी ओबीसी आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळं आता गुजरातमध्येही पुन्हा आरक्षणासाठी आंदोलनं होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.समस्त गुजरात ब्राह्मण समाजानं ओबीसी आयोगाला आरक्षणाच्या मागणीचं पत्र पाठवलं आहे. ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावं, त्यासाठी सर्व्हे केला जावा, असं त्यांचं म्हणणं आहे. गुजरातमध्ये ६० लाख ब्राह्मण आहेत. हा आकडा एकूण लोकसंख्येपैकी ९.५ टक्के आहे. ४२ लाख ब्राह्मण हे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यानुसार, गुजरात सरकारनं सर्व्हे करून ब्राह्मणांना आरक्षण द्यावं, अशी मागणी समाजाचे प्रमुख यज्ञेश दवे यांनी केली आहे. दुसरीकडे, राजपूत गारसिया समाज संघटनेच्या नेत्यांनीही ओबीसी आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. राजपूत समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी संघटनेचे नेते राजन चावडा यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. राजपुतांना नोकरी आणि शिक्षणामध्ये समान संधी दिली जात नाही. त्यांना मुख्यतः शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. इतर समाजांशी तुलना केल्यास आमच्या समाजातील कमावणाऱ्या महिलांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळं ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावं. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी आमच्या समाजाची लोकसंख्या ८ टक्के आहे. त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळावं, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2TXJUrZ
from Maharashtra Times https://ift.tt/2TXJUrZ
Post a Comment