दिव्यात डिटोनेटर्स, जिलेटिनच्या कांड्या जप्त

म. टा. वृत्तसेवा, ठाणे दिव्यात एका व्यक्तीकडे डिटोनेटर्स, जिलेटिनच्या कांड्या आदी स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केली आहेत. मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ही कारवाई केली होती. आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याने मुंब्रा पोलिसांचा तपास थांबला आहे. त्यामुळे ही स्फोटके आरोपीकडे आली कोठून किंवा या स्फोटकाचा वापर कशासाठी करण्यात येणार होता, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. आरोपीचे वय अंदाजे ४०च्या आसपास असून एकूण २५० जिलेटिनच्या कांड्या तसेच तितक्याच प्रमाणात डिटोनेटर्स हस्तगत केले आहेत. आरोपी हा दिव्यात राहणारा असल्याचे सूत्रांकडून समजते. स्फोटके पकडल्याचे पोलिस अधिकारी सांगत असले तरी अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2PcOPBT

No comments

Powered by Blogger.