बोगस पटसंख्येबाबत २ महिन्यांत कारवाईः तावडे
मुंबईः राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याबाबत शासन गंभीर आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची कार्यवाही सुरु आहे. येत्या २ महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करून दोषी आढळलेल्या संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांना पाठीशी घालण्यांविरुद्धही कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवरील कारवाई संदर्भात आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यातील विशेष पटपडताळणी मोहिमेमध्ये राज्यातील १,४०४ शाळांमध्ये आत्तापर्यंत ५० टक्के पेक्षा कमी उपस्थिती आढळून आली. विशेष पटपडताळणी मोहिममध्ये ५० टक्के कमी उपस्थिती आढळलेल्या व त्यानंतर कमी पटसंख्या असलेल्या व्यवस्थापनांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना २४ जुलै २०१८ रोजी दिलेले आहेत. याप्रकरणी काही शाळा उच्च न्यायालयात गेल्या. त्यावेळी न्यायालयाने शाळांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. राज्यातील शाळांमधील पटसंख्या सरल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड यामध्ये लिंक करण्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, उर्वरीत काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. आगामी शिक्षक भरती 'पवित्र'मार्फतयापुढील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यातून करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयातही यासंदर्भात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेची प्रशंसा केली आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करताना गुणवत्तापूर्ण उमेदवारीची निवड करण्यात येईल. त्यामुळे शिक्षक भरती होताना होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला. शिक्षकेतर भरती संदर्भात उच्च स्तरिय समितीचा मसुदा प्राप्त झाल्यानंतर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. दिलिप वळसे पाटील, शशिकांत शिंदे आदी सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.दहिसर येथील रुस्तमजी टुपर्स शाळेने नियमबाह्य शुल्क वाढ केल्याबाबत मुंबई महापालिकेच्या शिक्षणधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करण्यात आली आहे. परंतु याबाबत विभागीय स्तरावर चौकशी करण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. विधानसभेत तृप्ती सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2KMx4J2
from Maharashtra Times https://ift.tt/2KMx4J2
Post a Comment