बोला व घडी घाला; ओप्पोचा नवा मोबाइल येतोय!

नवी दिल्लीःमोबाइल निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या ओप्पो कंपनीनं फोल्डेबल मोबाइल आणण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये ओप्पोकडून हा मोबाइल लॉन्च केला जाणार असल्याचं समजतं.ओप्पो स्मार्टफोन कंपनी फोल्डेबल मोबाइलवर काम करत असल्याचं वृत्त यापूर्वीच माध्यमांमध्ये आलं होतं. मात्र, हा मोबाइल कधी लॉन्च होणार, याबाबत अस्पष्टता होती. मात्र, आता त्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. ओप्पोकडून लवकरच बाजारात फोल्डेबल मोबाइल आणला जाईल, अशी माहिती ओप्पोचे प्रॉडक्ट मेनेजर चुक वेंग यांनी दिल्याचं एका डच बॉगनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा मोबाइल लॉन्च केला जाईल असा या ब्लॉगमधून करण्यात आला आहे. पण, हा मोबाइल नेमका आहे कसा? त्याची आणखी वैशिष्ट्ये काय आहेत, याविषयी अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.५जी सुविधा असलेला ओप्पोचा स्मार्टफोन आगामी सहा महिन्यात युरोपीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2P7kaFW

No comments

Powered by Blogger.