दंतेवाडा: नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त; ८ अटकेत

दंतेवाडाःछत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात आज सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये उडालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत ८ नक्षलवाद्यांना अटक केली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली.दंतेवाडामधील किरंदूल पोलिस हद्दीत नक्षलवाद्यांचा तळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर जिल्हा राखीव पोलिस, केंद्रीय राखील पोलिस दल आणि किरंदूल पोलिस यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. पोलिसांनी सुरू केलेल्या शोधमोहिमेवेळी नक्षलवाद्यांनी अचानक बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिस पथकानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी उडालेल्या चकमकीत मोठी कारवाई करत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला आणि ८ नक्षलवाद्यांना अटक केली. या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी या घटनेला दुजोरा दिला. तत्पूर्वी छत्तीसगडमधील बीजापूर येथे १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले होते.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2zAwGbZ

No comments

Powered by Blogger.