शिवसेनेमुळे मुंबई महापालिकेने भूखंड गमावला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईआरक्षण असलेले भूखंड ताब्यात घेण्यासाठी एकीकडे महापालिका आग्रही असली तरी शिवसेनेला हे भूखंड कुणाच्यातरी घशात जावेत, असेच वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या कुर्ला येथील मोक्याच्या जागेवरील कोट्यवधी रुपयांच्या भूखंडावर सेनेने अक्षरश: पाणी ओतले आहे. भूखंडावर अतिक्रमण असल्याचा दावा करत तो पालिकेने ताब्यात घेऊ नये, म्हणून उपसूचना मांडून शिवसेनेने सुधार समितीत एकमताने मंजूर झालेला प्रस्ताव गुरुवारी सभागृहात दप्तरी दाखल केला. विशेष म्हणजे भाजपनेही त्यास विरोध केला नाही. शिवसेनेचा हा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.कुर्ला येथे एका जमीनमालकाचा ९७८ चौरस मीटरचा खासगी भूखंड पालिकेने उद्यानासाठी आरक्षित केला होता. जमीन मालकाला तीन कोटी ८३ लाख रुपये देऊन हा भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव गुरुवारी पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी आला असता शिवसेनेने आपली भूमिका बदलली. शिवसेनेचे नगरसेवक अनंत नर यांनी उपसूचना मांडून हा भूखंड पालिकेने खरेदी करू नये, अशी मागणी केली. त्यास विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव व समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी आक्षेप घेतला. मात्र हा विरोध मोडीत काढत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उपसूचना मतास टाकत भूखंड खरेदीचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला....तर न्यायालयात जाणारदरम्यान याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ५२०-सी अंतर्गत भूखंड ताब्यात घेण्याची विनंती करणार आहोत. त्यास प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.नगरसेवकाच्या हट्टामुळे शिवसेना अडचणीतशिवसेनेच्या कुर्ला येथील एका नगरसेवकाच्या हट्टामुळे भूखंड खरेदीचा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचे सांगितले जाते. भूखंड हातचा जाणार असल्याची शिवसेनेच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले. भूखंडप्रकरणी शिवसेना अडचणीत आल्याचे समजताच महापौर विश्वनाथ महाडेश्वर सभागृह संपताच मुख्यालयाच्या बाहेर पडले.भूखंड खरेदीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी शिवसेनेने केलेला हा भूखंड घोटाळा असल्याचा आरोप केला. एकीकडे आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी आग्रही असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे बिल्डरांसाठी भूखंड सोडायचे हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका राजा यांनी केली. ही तर शिवसेनेची जुनी खेळी असून हा भूखंड लाटण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला. फक्त बिल्डरचा लाभ लक्षात घेऊन शिवसेनेने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप रईस शेख यांनी केला.भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्रपालिका सभागृह कधीच वेळेत सुरू होत नाही. त्यामुळे काही नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आपण दालनात होतो. मात्र महापौरांनी अचानक सभागृहात येऊन भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. त्याला भाजपचा विरोध असून हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2P9OnnN
from Maharashtra Times https://ift.tt/2P9OnnN
Post a Comment