मुंबईत १०व्या मजल्यावरून पडून २ कामगार ठार

मुंबईचेंबूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या १०व्या मजल्यावरून ४ कामगार पडले. यापैक दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. जखमींना महापालिकेच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओसमोर मैत्री पार्क बस स्टॉपच्या बाजूला असलेल्या शबरी एंटर प्रयजेस या कमर्शियल बिल्डिंगमध्ये खिडकीचं काम सुरू होतं. हे काम करत असताना ४ कामगार खाली पडले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.मृतांची नावे१) अहमद शहादत शेख, (वय- ३२ वर्षे)२) राजेंद्र बट्टीलाल कोल (वय- ४५ वर्षे)मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2zxXpG5

No comments

Powered by Blogger.