'२.०' च्या प्रदर्शनापूर्वी १२,००० वेबसाइट्स ब्लॉक

मुंबई:सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा बहुचर्चीत '२.०' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने ३७ इंटरनेट सेवा देणाऱ्या (आयएसपी) १२,००० हून अधिक वेबसाइट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. या पैकी काही वेबसाइटवरून चित्रपटांची पायरसी करण्यात येते. यातील २००० हून अधिक वेबसाइट्स तमिळ रॉकर्स नियंत्रित करतात. तमिळ रॉकर्स डॉट कॉम एक पायरसी वेबसाइट आहे. या वेबसाइटवरून अनेक भाषांचे पायरसी चित्रपट लीक केले जातात. बॉलीवूड आणि हॉलीवूडसह इतर भाषेतील सिनेमेही वेबसाइटवर लीक केले जातात. यामुळे या वेबसाइटची सेवा ब्लॉक करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. '२.०' सिनेमाची निर्माती कंपनी लिका प्रोडक्शनने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एम. सुंदर यांनी या याचिकेवर सुनावणी केली.तमिल रॉकर्स वेबसाइट चालवणाऱ्या काही जणांना पोलिसांनी पायरसी प्रकरणी जुलैमध्ये अटक केली होती. तरीही ऑगस्ट महिन्यात या वेबसाइटवरून बॉलिवूडमधील बरेच चित्रपट लीक झाले होते. तापसी पन्नूचा 'मुल्क' सिनेमाही या वेबसाइटवरून लीक करण्यात आला होता. तमिल रॉकर्स वेबसाइटवर बंदी घातल्यानंतरही वेगवेगळ्या डोमेनवरून हे तमिल रॉकर्स चित्रपट लीक करत आहेत.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2Q33sNh

No comments

Powered by Blogger.