हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस: मिताली राज

नवी दिल्ली :टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यात निर्माण झालेला वाद विकोपाला गेला असून मितालीने पुन्हा एकदा रमेश पोवारला लक्ष्य केलं आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस असल्याचे नमूद करत मितालीने आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.'माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत ते क्लेशदायक आहेत. मनावर खोलवर आघात करणारे आहेत. क्रिकेटबद्दल असलेली कटिबद्धता आणि देशासाठी २० वर्षे खेळताना मी जी मेहनत घेतली आहे, जो घाम गाळला आहे, ते सारं आज व्यर्थ ठरलं आहे. आता माझ्या देशभक्तीवर संशय घेतला जाऊ लागला आहे. माझ्यातील गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. माझ्यावर आरोपांची चिखलफेक होत आहे...हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस आहे, असे मी म्हणेन. ईश्वर मला या सर्वाशी लढण्यासाठी बळ देवो', अशा शब्दांत मितालीने ट्विटरवरून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. दरम्यान, रमेश पोवारने बीसीसीआयला दहा पानी अहवाल सादर केला असून त्यातील पाच पाने मितालीबाबतच्या मजुकराने भरली आहेत. मितालीने डावाची सुरुवात करण्याची संधी न दिल्यास दौरा अर्धवट सोडण्याची आणि निवृत्ती घेण्याची धमकी दिली होती. ती संघासाठी नाही तर वैयक्तिक रेकॉर्डसाठीच खेळत होती. तिच्याकडून सातत्याने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप रमेश पोवारने अहवालात केला आहे. या आरोपांनी मिताली व पोवार यांच्यातील वाद अधिकच चिघळणार अशी चिन्हे आहेत.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2RhcN0q

No comments

Powered by Blogger.