मितालीसोबतचा वाद रमेश पोवारला भोवणार?
नवी दिल्ली: भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक रमेश पोवारला मिताली राजसोबतचा वाद चांगलाच महागात पडेल, अशी चिन्हे आहेत. पोवारचा करार आज, शुक्रवारी संपत असून, मिताली आणि त्याच्यातील वादामुळं हा करार पुढे वाढवण्यात येणार नाही, असं बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजतं. वर्ल्डकप टी-२० स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यातून मितालीला वगळण्यात आलं होतं. यामुळं वाद निर्माण झाला असून, भारतीय महिला क्रिकेट ढवळून निघालं आहे. मिताली आणि रमेश पोवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. मिताली ही अलिप्त राहणारी खेळाडू असून, तिचा स्वभाव दुराग्रही होता, असं पोवारनं म्हटलं होतं. तर माझ्याबद्दल जे सांगितलं गेलं आहे, त्यामुळं मी खूप दुःखी आहे. माझ्या आयुष्यातील काळा दिवस असल्याचं तिनं म्हटलं आहे. मितालीसोबतचा हा वाद रमेश पोवारला भोवणार असल्याची चिन्हे आहेत. पोवारचा करार आज संपणार असून, तो पुढे वाढवण्यात येणार नाही, असं बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात येतंय. मिताली आणि पोवारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, त्याचा संघावर विपरित परिणाम होऊ शकतो, असं वाटत असल्यानं पोवारचा करार वाढवण्यात येणार नाही, असं समजतं. मितालीला वगळण्याच्या निर्णयामुळं बीसीसीआयचे पदाधिकारीही पोवारवर नाराज आहेत. मितालीनं लागोपाठ दोन अर्धशतके झळकावली होती आणि दोन वेळा सामनावीरही ठरली होती. मितालीला संघातून का वगळलं याचं ठोस कारणही पोवार सांगू शकला नाही. याशिवाय अतिमहत्त्वाच्या अशा उपांत्य फेरीच्या सामन्यातून तिला का डच्चू दिला? असा प्रश्न उपस्थित करत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतं.हा कारकीर्दीतला काळा दिवस: मिताली मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2zwNqkm
from Maharashtra Times https://ift.tt/2zwNqkm
Post a Comment