ठाणे: 'मटा'चे पत्रकार आशिष पाठक यांचं निधन
कल्याणमहाराष्ट्र टाइम्सचे ठाणे विभागाचे विशेष प्रतिनिधी, पत्रकार आशिष पाठक (३८) यांचं आज कल्याण इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते गेल्या काही वर्षांपासून रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. गुरुवारी मध्यरात्री प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना कल्याणच्या पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि ८ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.आशिष पाठक हे २००८ पासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत होते. एक हरहुन्नरी आणि झुंजार पत्रकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. गेल्या सहा ते सात वर्षांपासून ते ठाणे विभागाचं वार्तांकन करत होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संबंधात त्यांनी दिलेल्या बातम्या प्रचंड गाजल्या. रेल्वे हा त्या आशिष पाठक यांचा आवडता विषय होता. त्याविषयीही त्यांनी विशेष बातम्या दिल्या. साधा-सरळ स्वभाव आणि कामाची आवड असलेल्या आशिष यांना २०१५ साली कॅन्सरनं गाठलं. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या आजारावर मात करून पाठक पुन्हा कामावर रुजू झाले होते. गेल्या वर्षभरापासून ते पुन्हा जोमाने काम करू लागले होते. पण आजारानं पुन्हा डोकं वर काढलं. गुरुवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळं एक उमदा पत्रकार व प्रेमळ मित्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2QpnFvV
from Maharashtra Times https://ift.tt/2QpnFvV
Post a Comment