तरुणांना लुटणाऱ्या गुजराती अभिनेत्रीला अटक

अहमदाबाद तरुणांना डान्स शोमध्ये बोलावून त्यांना लुटणाऱ्या गुजराती अभिनेत्रीला अहमदाबाद पोलिसांनी अखेर अटक केली आहे. ही अभिनेत्री लोकांना तिच्या डान्स शोमध्ये बोलवायची, त्यांच्याशी लगट करायची, त्याचा व्हिडिओ शूट करायची व नंतर तो व्हिडिओ दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करायची, असा तिच्यावर आरोप आहे. अहमदाबाद पोलिसांकडे या अभिनेत्रीच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर या अभिनेत्रीचे खरे रुप समोर आले. संजना उर्फ संजू असं या अभिनेत्रीचं नाव असून तिनं 'जानू मारी दगाबाज', 'वन्स मोर बेवफा' यासारख्या गुजराती अल्बममध्ये काम केले आहे. संजनाला बऱ्याच दिवसांपासून काम मिळत नव्हते. ती बेरोजगार होती. पैसे कमावण्यासाठी तिनं डान्स शो सुरू केला. या डान्स शोमध्ये ती लोकांना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांना लुटायची. या कामात तिला तिचा बॉयफ्रेंड सय्यद मोईन अली साथ द्यायचा. संजनाचे लग्न झाले होते व ती सध्या पतीपासून वेगळे राहत होती. रामोल येथे राहणाऱ्या संजनाची ओळख सय्यद मोईन अलीसोबत झाली त्यानंतर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times https://ift.tt/2FOqoex

No comments

Powered by Blogger.