मराठा समाजाच्या लढ्याला यश; शिक्षण, नोकरीत १६% आरक्षण
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला आज अखेर यश आलं. मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण मिळालं आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळं राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षण तात्काळ लागू होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं. हे विधेयक कोणत्याही चर्चेविना आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. तत्पूर्वी, मागासवर्ग आयोगानं दिलेला मराठा आरक्षण अहवालावरील 'अॅक्शन टेकन रिपोर्ट' (एटीआर) मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला. मात्र, एटीआर नको तर संपूर्ण अहवालच सादर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मात्र, सरकारनं ती धुडकावून लावली. त्यामुळं प्रचंड गदारोळ झाला आणि सभागृहाचं कामकाज तहकूब झालं.विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विधेयक सादर केलं. विरोधी बाकांवरील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं या विधेयकाला अनुमोदन दिलं. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आधीच ठरल्याप्रमाणं या विधेयकावर कुठलीही चर्चा झाली नाही. ते आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. त्यानंतर मुख्यंत्र्यांनी विधान परिषदेतही विधेयक मांडलं. तिथंही ते आवाजी मतादनानं मंजूर करण्यात आलं.विधेयकातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे> मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण> अनुदानित वा विनाअनुदानित सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या एकूण जागांपैकी १६ टक्के जागांवर आरक्षण. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये ही सुविधा नसेल.> राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या लोकसेवांमधील व इतर पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या १६ टक्के आरक्षणमोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2AAIqe7
from Maharashtra Times https://ift.tt/2AAIqe7
Post a Comment